पुणे-उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेनंतर जे आरोपी होते त्यांना अटक न करता सुरुवातीला अत्याचार ग्रस्त मुलीच्या वडिलालाच अटक करण्यात आली. अत्याचारग्रस्त कुटुंबातील प्रमुखालाच अटक करायची अशी नादान परिस्थिती देशात कधीच पहिली नाही असे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान गप्प का?
सामान्य जनतेच्या डोक्यावर आज अत्याचाराचे ओझे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अन्याया विरोधात सर्वांनी उभे राहून माजलेली सत्ता उलटून टाकली पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी विविध मुद्यांना हात घालत सरकारवर तिकाश्त्र सोडले. यावेळी विशेषत पंतप्रधान यांनी बलात्काराच्या घटनेवर मोन पाळले असल्याने त्यांनी टीका केली. मनमोहनसिंग यांच्यावर टीका करणारे आज का गप्प आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
सर्व नियुक्त्या करू
येत्या आठ ते दहा दिवसात संपूर्ण नियुक्ता केले जातील. नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्यात येईल. महिला, दलित, आदिवशी, ओबीसी यांना अधिक संधी दिली जाईल. सर्वसमावेश अशी ही नियुक्ती करण्यात येईल असे शरद पवार यांनी सांगितले.