मुंबई: सेना, भाजपा मध्ये सत्तेवरून वाद सुरु असतांना आज रामदास आठवले यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. रामदास आठवले यांनी राज्यातील सत्तास्थापन करण्यासाठी मध्यस्थी करावी यासठी आपण भेट घेतली असल्याचे सांगितले. राज्यात शरद पवार यांच्या शब्दाला मान असल्याने त्यांनी तोडगा काढण्यात यावा असे सांगितले.
शरद पवार यांनी शिवसेना, भाजपाने समजंसपणा घेत सत्ता स्थापन करण्यात यावे असे सांगितले. तसेच राज्यपालांनी ज्या पक्षाला बहुमत असेल त्यांना सत्तास्थापन करण्यासाठी बोलवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने सेना, भाजपाला कौल दिला असून, राज्यातील बिघडलेली स्थिती सुधारावी असे पवारांनी भेटीनंतर सांगितले.