अदानी प्रकरणावरून शरद पवारांनी काँग्रेसला फटकारले; म्हणाले,..
आम्ही तर या कंपनीचे कधी नावही ऐकलं नव्हतं
मुंबई : उद्योगपती गौतम अदाणी आणि अदाणी समूहावर हिंडनबर्ग रिसर्च या कंपनीने धक्कादायक आरोप केले होते. या आरोपानंतर आदाणी समूहाला मोठा फटका बसला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे. हिंडेनबर्ग कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नाही. एका परदेशी कंपनीच्या आहवालाने देशात खळबळ उडाली. अशा प्रकारची वक्तव्ये यापूर्वीही काही लोकांनी केली होती. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता.
आम्ही तर या कंपनीचे कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीती पार्श्वभूमी काय माहिती नव्हते. अशा विषयावर देशात गदारोळ झाला, तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.