मुंबई-टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात जखमी झाले आहेत. एका लग्न समारंभातून परतत असताना पालघर जवळ शार्दुलचे वडील नरेंद्र आणि आई हंसा ठाकूर यांच्या दुचाकीला अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ठाकूर कुटुंबीय पालघरमधील माहीम गावचे रहिवासी आहेत. ठाकूर दाम्पत्य हे पालघर अल्याळीमध्ये एका लग्नाला गेले होते. लग्नानंतर परतत असताना त्यांची दुचाकी घसरली. त्यात ते दोघेही जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर नरेंद्र ठाकूर यांना मुंबईतील लीलावती रूग्णालयात हलवण्यात आले.
शार्दुल मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. त्याने ३१ ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील दहाव्या चेंडूवर त्याने करिअरमधील पहिली विकेट घेतली होती. नोव्हेंबर २०१२ मध्ये राजस्थानविरोधात प्रथमश्रेणीच्या सामन्यात पर्दापण केले होते.
शार्दुल सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे. मंगळवारी संध्याकाळीच शार्दुलची इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली आहे. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिका दौरा आणि श्रीलंकेविरोधातील मालिकेसाठी भारतीय संघात होता.
Hansa Thakur and Narendra Thakur, parents of cricketer Shardul Thakur, got injured after the motorcycle they were travelling on slipped, when they were returning from a wedding ceremony in #Palghar last night. Both admitted to hospital #Maharashtra
— ANI (@ANI) May 9, 2018