मोदींच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी

0

नवी दिल्ली: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. आज सेंसेक्सने ऐतिहासिक उसळी घेत उच्चांक गाठले आहे. सेंसेक्समध्ये १४० अंकांनी वाढ होऊन सेंसेक्स ४० हजार १८.२४ वर पोहोचले आहे.