शत्रुघ्न सिन्हा यांचा येडियुरप्पा यांना टोला

0

बंगळूर-आपल्याच पक्षाविरोधात भाष्य करून नेहमी चर्चेत असणारे भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कर्नाटकात भाजपाला बहुमत गाठता आलेले नाही. त्यातच काँग्रेस-जेडीएस यांना जागा कमी मिळूनही त्यांनी सत्ता स्थापनेसाठी दावा केल्याने भाजपासमोर पेच पडला आहे. त्यातच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर उपहासात्मक भाष्य करून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा, काँग्रेस, जेडीएसचे अभिनंदन करताना भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांना टोलाही लगावला.

निवडणूक जिंकण्याआधी आपल्या शपथविधीची तारीख जाहीर करणाऱ्या येडियुरप्पांचे विशेष अभिनंदन आणि ज्यांनी निवडणुकीसाठी कठोर मेहनत घेतली त्यांचेही अभिनंदन, विजयी कर्नाटका, जय हिंद, असे ट्विट त्यांनी केले आहे.