नवी दिल्ली- यूएस फेडने व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील बाजारात कमजोरी पहावयास मिळत आहे. याचा परिणाम डोमेस्टिक मार्केटवर होत आहे. सोबतच याचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला असून आज सेन्सेक्स व निफ्टीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कामकाज सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स २०३ अंकांनी खाली येऊन ३५ हजार ५३६ अंकावर गेले आहे. सोबतच निफ्टी ६४ अंकांनी खाली आले असून तो १० हजार ७९३ वर पोहोचले आहे. आशियाई बाजारात कमजोरी आली आहे.
हे शेअर तेजीत आणि मंदीत
कामकाज सुरु झाल्यानंतर डॉ. रेड्डीज, सिप्ला, एयरटेल, ल्यूपिन, सनफार्मा, वकरांगी, क्वालिटी, शारदा क्रॉप, पीसी ज्वेलर्स या कंपनीचे शेअर १.४० टक्क्यांनी तेजीत आहे. तर एक्सिस बँक, आईओसी, हिंदुस्तान पेट्रोलियम, अल्ट्राटेक सीमेंट, एसबीआई, ओबेरॉय रियल्टी, रेनुका, माइंडट्री आणि एमओआईएलच्या शेअरमध्ये १.१३ टक्के कमी झाले आहे.