शेअर मार्केटमध्ये उत्साह; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलमध्ये एनडीएची स्थिर सरकार येणार असल्याचे दिसून येते. स्थिर सरकार येण्याच्या मुद्द्यावर शेअर मार्केटमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आज सेंसेक्समध्ये ७६.४० अंकांनी वाढ होऊन सेंसेक्स ३९ हजार ०४६ वर पोहोचले आहे तर निफ्टीतही वाढ झाली आहे. निफ्टी १५.८० अंकांनी वाढत ११ हजार ७२४ वर पोहोचले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे.