मुंबई- भारतीय शेअर बाजार आज पुन्हा घसरणीने सुरु झाला. सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आणि निफ्टी देखील 10,050 च्या खाली गेला आहे. येस बँकेचे शेअर्स 10% घसरून 178.55 वर आले आहे. उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर 15%, इक्विटस होल्डिंग्ज लिमिटेडचे 17% घसरले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण देखील सुरु असून आज रुपया 73.43 वर पोहोचाल आहे. जे काल 73.28 वर बंद झाले होते.