मुंबई- ख्रिसमसच्या सुटीनंतर आज बुधवारी शेअर बाजार सेन्सेक्स २६.९९ अंक (०.०८ टक्के) आणि निफ्टी २८.०५ अंकांनी (०.२६ टक्के) घसरणीने सुरु झाला. सेन्सेक्स व निफ्टी क्रमश: ३५,४४३.१६ आणि १०,६३५.४५ वर खुला झाला. मात्र काही वेळातच बाजारात घसरण दिसून आली.
ओएनजीसी, एशियन पेंट, कोल इंडिया या कंपनी वगळता सूचकांकातील इतर सर्व शेअर्समध्ये घसरण झाली होती. तर निफ्टीत हिंदुस्तान पेट्रोलियम, बीपीसीएल, आयओसी, कोल इंडिया, ओनएजीसी टॉप गेनर्स राहिले. हिंदुस्थान यूनिलिव्हर, सनफार्मा, इंडियाबुल्स, हाऊसिंग फायनान्स, विप्रो इंडसइंड बँक यांच्यात घसरण झाली.
सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सेन्सेक्स २७७.१६ अंकानी घसरून ३५,१९२.९९ वर होता तर निफ्टीमध्ये ७३.८० अंकाची घसरण झाली होती. तत्पूर्वी सोमवारी सेन्सेक्स २७१.९२ अंकानी घसरणीसह ३५.४७०.१५ आणि निफ्टी ९०.५० अंकाच्या घसरणीसह १०.६६३.५० अंकावर बंद झाला होता.