नाराज शिखर धवन सोडणार सनराइजर्स हैदराबाद; नवीन टीम मुंबई असण्याची शक्यता?

0

नवी दिल्ली-भारतीय सलामीचा जलद फलंदाज गब्बर शिखर धवन सध्या सनराइजर्स हैदराबाद संघावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच ते सनराइजर्स हैदराबाद संघाला रामराम ठोकणार असून नवीन फ्रैंचाइजी कोणती असणार याबाबतही अद्याप घोषणा केलेली नाही. परंतु ते मुंबई संघाकडून खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिखर धवनने मुंबई इंडियन संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतल्यास ते मुंबई इंडियनचे ओपनर फलंदाज रोहित शर्मा सोबत ओपेनिंगला येऊ शकतात.