ब्रिस्बेन- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा सलामीवीर शिखर धवनने केल्या. या सामन्यात दमदार फलंदाजी करत धवनने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाचा रेकॉर्ड मोडला. धवनने या कॅलेंडर वर्षात 646 धावा केल्या आहेत. हा विक्रम यापूर्वी कोहलीच्या नावावर होता कोहलीने 2016 साली 641 धावा केल्या होत्या.
धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात 42 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 76 धावांची खेळी साकारली होती. पण ही खेळी साकारल्यानंतरही धवनला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते.