नवी दिल्ली: 12 वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा लवकरच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करू शकते. फिटनेस आणि टीव्ही शोमुळे चर्चेत राहणाऱ्या शिल्पाने 1993 मध्ये शाहरूख खान स्टारर ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपले फिल्मी करिअर सुरु केले होते. 44 वर्षीय शिल्पा अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये शिल्पाने आपल्या कमबॅकचे संकेत दिलेत. हिंदी चित्रपटांशी माझे नाते संपलेले नाही. ते आजही कायम आहे. सध्या माझ्याकडे कमीत कमी पाच स्क्रिप्ट आहेत. ज्या मी वाचते आहे. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पाचपैकी जी स्क्रिप्ट मला आवडेल, त्या चित्रपटातून मी कमबॅक करेल, असे शिल्पाने सांगितले.
अलीकडे ‘ह्यूमन्स आॅफ बॉम्बे’शी बोलताना शिल्पाने तिच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या होत्या. मी उंच, बारीक आणि वर्णाने काळी होते. ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करत असताना एकदा गमतीगमतीत मी एका फॅशन शोमध्ये भाग घेतला. यादरम्यान एका फोटोग्राफरशी माझी ओळख झाली. त्याला माझे फोटो काढायचे होते. त्याने माझे फोटो काढलेत आणि ते फोटो पाहुन मी हैराण झाले. मी करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. मात्र सगळं काही सहज मिळत नाही. केवळ वयाच्या 17 व्या वर्षी मी फिल्म इंडस्ट्रित पाऊल ठेवले. मला हिंदीही नीट बोलता येत नव्हते, असे तिने सांगितले होते.