भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजप शिंदे गटाचे विकास पॅनल च्या 18 पैकी 15जागा तर सहकार पॅनल च्या 3 जागा
भुसावळ प्रतिनिधी
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या आज लागलेल्या निकालात भाजप प्रणीत पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून आमदार संजय सावकारे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
वळ कृषी उत्पन्न बाजार समितीत यावेळी मोठी चुरस पाहण्यास मिळाली. यात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये प्रणप्रतीष्ठेची लढत झाली. यात संजय सावकारे यांनी भाजपच्या पॅनलचे तर आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचे नेतृत्व केले. निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. निवडणुकीत तब्बल ९८ टक्के मतदारांनी मतदान केल्याने ही वाढीव टक्केवारी नेमकी काय निकाल लावणार याची उत्सुकता लागली होती.
दरम्यान, आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. यात शेतकरी विकास पॅनलने पहिल्यापासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. यात आमदार संजय सावकारे यांच्या भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा १८ पैकी १५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला असून त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.