शिंदखेडा-देशात जैन समाजाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी केले.ते मा. नगरसेवक सूरज देसले मित्र परिवार तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ सोबत भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा यांची अल्पसंख्यक विषयी राज्य प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्द्ल त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. याच बरोबर संदीप देसले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्द्ल त्यांचा ही सत्कार करण्यात आला.
पीआय भाबड पुढे म्हणाले, जैन समाज दान देण्यात पुढे आहे. शिस्त, चिकाटी ही त्यांच्याकडुन सिखावी.मी स्वता:नेमिनाथ जैन गुरुकुल चांदवड येथील फार्मसीचा विद्यार्थी होतो.गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, मित्र जोडतांना काळजी घ्या.व्यसनांन पासून दूर रहा. प्रा.डागा यांनी ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतील तफावत आता कमी झाली आहे.ग्रामीण विद्यार्थी ही सर्व क्षेत्रात चमकत आहे.गुणवंत विद्यार्थी व आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या समवेत माझा सत्कार होत असल्याचे समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. पीआय सुनील भाबड,माजी नगरसेवक सुरज देसले,संदीप देसले ,प्रवीण बैसाने,रणजित गिरासे,योगेश देसले सर,अक्षय वाणी, डॉ.सुमित गिरासे,गुदडू गुरव,तुषार पाटील,पंकज राजपूत,महेश गुरव,कालु सकट आदीसह विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो -प्रा. चंद्रकांत डागा यांचा सत्कार करतांना पीआय सुनील भाबड,शेजारी मा. नगर सेवक सूरज देसले, संदीप देसले आदि.