शिरपूर पं.स या कार्यालयात कर्मचार्‍याकडून अभियंत्याची ‘ऑनड्युटी’ ‘मसाज’

0

कार्यालय बनले मसाज पार्लर ; व्हिडीओ क्लिप व्हायलर ; नागरिकांना केले कार्यालयाबाहेर टाळकळत उभे

शिरपूर – येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याच्या शारीरीक व्याधींवर कनिष्ठ कर्मचार्‍याने कार्यालयातच मसाज केल्याचा प्रकार समोर आला आहे. पं.स.च्या बांधकाम विभागात ऑन ड्युटी घडलेल्या प्रकाराची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने शिरपूरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष मसाज सुरु असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांनाही अभियंत्यांनी ताटकळत उभे ठेवले होते.

शिरपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. तसेच शिरपूर तालुक्यात बांधकामाचे कामे भरपूर स्वरूपात खेडोपाडी सुरू असल्याने पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला नेहमीच बांधकामावर लक्ष देण्यासाठी रोज उन्हातानात खेडोपाडी फिरावे लागते . तसेच कार्यालयीन कामे ही भरपूर असतात . काही वेळा या अधिकार्‍यांना चहा -पाण्याचाही विसर पडतो ? वेळेवर जेवण नसते. ते कधीच बाहेर गावाहून कामानिमित्ताने आलेल्या लोकांना टाळकळत ठेवत नाही ? लगेच त्यांची कामे करून देतात ? त्यामुळे निश्चितच पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना (अति) जास्तीचे कामे केल्यामुळे थकवा अंगदुखी पाय दुखणे असे शारीरिक व्याध्या वाढू लागल्याने दिसून येत आहे. त्यामुळेच शिरपूरच्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयातच मसाज पार्लर खोलून कनिष्ठ कर्मचार्‍यांकडून मसाज करून थकवा दूर करण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. त्यात अभियंता भोई यांना तर कार्यालयीन वेळेतच कार्यालयात (अति)जास्तच थकवा आल्याने कनिष्ठ कर्मचारी त्यांच्या पायांची मसाज करून त्यांचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

संबंधितांवर कारवाई होणार काय?
कर्मचारी अधिकार्‍यांचा मसाज करुन पगार घेतात. की प्रत्यक्ष बांधकाम विभागात शासनाचे काम करुन पगार घेतात, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ऑन ड्युटी घडलेल्या या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी अधिकार्‍यांवर कार्यवाही करणार की, आपला ही मसाज या कार्यालयीन पार्लरमध्ये करून आपला थकवा दूर करणार ? या कडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.