मनसेला धक्का; शिशीर शिंदे सेनेच्या वाटेवर

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती असे सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती.

गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते. दरम्यान आता पर्यंत मनसेला बड्या नेत्यांनी रामराम ठोकले आहे त्यात नाशिकमधील वसंत गिते, मुंबईमधील राम कदम आणि प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे.