हिंदूंची बदनामी केल्याच्या आरोपावरून सेनेची नेटफ्लिक्सविरोधात तक्रार !

0

मुंबई: मनोरंजन क्षेत्रात नेटफ्लिक्सचा मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला आहे. सध्या वेबसिरीजला अधिक पसंती मिळत आहे, अनेक वेबसिरीज नेटफ्लिक्सवर सुरु आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. मात्र नेटफ्लिक्सविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना आयटी सेलचे सदस्य रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात हिंदू धर्म आणि भारतीयांची बदनामी केल्याचे आरोप करत तक्रार नोंदविली आहे. एलटी मार्ग पोलीस ठाण्यात नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

सॅक्रेड गेम, मिर्झापूर यांसह अनेक वेबसिरीज नेटफ्लिक्सवर सध्या गाजत आहे.