आमदार प्रताप सरनाईकांचा पुत्र ताब्यात; दोन्ही मुलांची समोरासमोर चौकशी

0

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयात सक्तवसुली संचलनालय अर्थात (ईडी)ने आज मंगळवारी धडक दिली आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीने धाड टाकली होती. दरम्यान प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंगला ईडीने ताब्यात घेतले असून दोन्ही मुलांची समोरासमोर तपास सुरु केला आहे. सध्या प्रताप सरनाईक परदेशात आहेत. महाराष्ट्र पोलिसांची मदत न घेता सीआरपीएफ जवानांच्या मदतीने ईडीने छापा टाकला आहे. तब्बल ४० जवान ईडीसोबत आहेत. दरम्यान या घटनेवरून आता राजकारण सुरु झाले आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि मनी लॉण्ड्रिंगचे हे प्रकरण असल्याचे बोलले जात आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता शिवसेनेचे इतर काही नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनाही नोटीस मिळाल्याची चर्चा आहे.