मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर विधानसभा निवडणुकीसाठीचा शिवसेनेचा वचननामा (जाहीरनामा) प्रकाशित केला. या वचननाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हा वचननामा 5 वर्षांसाठी असून त्याचे कामही सत्ता आल्यानंतर लगेच सुरू करण्यात येईल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी जाहीरनामा जाहीर करताना हा जाहीरनामा नसून वचननामा आहे, त्यामुळे यातील सर्व आश्वसने पूर्ण केली जातील, असा दावा केला आहे. तसेच शिवसेना आणि भाजपाचा जाहीरनामा वेगवेगळा असून त्यांचाही लवकरच प्रकाशित होईल. मी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे आमच्या आणि त्यांच्या जाहीरनाम्याला दोघांचीही संमती आहे.
असा आहे वचननामा
फक्तं 10 रुपयांमध्ये जेवणाची सकस थाळी. त्याच कँटीनमध्ये 100 रुपयांपर्यंत जेवण मिळणार.
गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा
वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
महिला सक्षमीकरणावर भर.
महिला बच गटासाठी जिल्हास्तरावर कँटीन
तिर्थक्षेत्र प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापना
खतांचे दर 5 वर्ष स्थीर राहतील, याची योजना
नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीकविमा मिळणार
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष तरतूद
घरगुती वापरातील विजेचे दर 30 टक्क्यांनी कमी करणार
मुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार