यावल नगरपालीकेच्या नविन साठवन तलावाच्या कामाची चौकशी करण्यात यावी शिवसेना ( उबाठा)चे प्रांत अधिकारींना निवेदन

यावल ( प्रतिनिधी ) येथील नगरपालीके च्या माध्यमातुन लाखो रुपये खर्च करून शहर वासीयांना मुबलक पाणीपुरवठा मिळावा यासाठी नविन साठवन तलावाची निर्मिंती करण्यात आली आहे मात्र या तलावातुन शहरात पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमुद करून नविन साठवन तलावाच्या इनलेट / आऊटलेट निविदाची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शिवसेना(उबाठा )यावल शहर आणि तालुका शाखेच्या वतीने फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत निवेदनाव्दारे करण्यात आली आहे . या संदर्भात यावल शहर व तालुका शिवसेना ( उबाठा )च्या वतीने प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , यावल नगरपालीके च्या माध्यमातुन यावल शहरवासीयांना स्वच्छ आणी मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नविन साठवन तलावाची उभारणी करण्यात आली असुन ,दरम्यान साठवन तलावाची ताडपत्री निविदे प्रमाणे तळाशी टाकण्यात आलेली नाही ,साठवन तलावाचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचे शिवसेनेने तक्रार निवेदनात म्हटले आहे. नविन साठवन तलावाची उच्चस्तरिय संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय संबधीत ठेकेदाराचे बिल देण्यात येवु नये अशी मागणी करण्यात आली असुन, या निवेदनावर शिवसेना (उबाठा ) चे जळगाव जिल्हा उप प्रमुख गोपाळ चौधरी,यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले ,शहर उपप्रमुख संतोष खर्चे,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी ,योगेश पाटील , शिसेनेच्या आदीवासी विभागा चे तालुका प्रमुख हुसैन तडवी, पप्पु जोशी ,अजहर खाटीक,विजय पंडीत, पिंटू कुंभार ,युवा सेनेचे सागर देवांग यांच्या स्वाक्षरी आहेत .