आरक्षण प्रश्नी दिल्लीत जावे लागले तरी शिवसेना मदत करेल; उद्धव ठाकरे

0

मुंबई: राज्यसरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे वैध असल्याचे उच्च न्यायालयाने अबाधित ठेवले आहे. सरकारी नोकरी, शिक्षण संस्थेत मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असे न्यायालयाने म्हटले आहे. हे आरक्षण लागू झाल्यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी दिल्लीत जरी जावे लागले तरी त्या ठिकाणी आपण जिंकू त्यात शिवसेना पूर्ण मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आपण कोणत्याही वादात न पडता शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र आल्यास आपली ताकत वाढेल. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले आहे. या वादात रमू नका असे आवाहन त्यांनी आरक्षणविरोधी गटाला केले आहे.