सावरकरांबाबत आपली भूमिका सोडणार नाही; संजय राऊत

0

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष सत्तास्थापन करण्यसाठी प्रयत्न करत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी शिवसेनेला सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यावर शिवसेनेचे राज्यसभा खा. संजय राऊत यांनी सावरकरांबाबत शिवसेना आपली भूमिका सोडणार नाही असल्याचा दावा केला आहे. आता यावर कॉंग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

निवडणुकीत भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले होते. कॉंग्रेस पक्षाने यावर आक्षेप घेत, महात्मा गांधी यांच्या हत्येशी सबंध असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. सावरकरांचा गांधी हत्येशी संबध असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेने सावरकरांबाबत आपली भूमिका कायम ठेवल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.