बिग बॉस विजेता शिव ठाकरे मनसेसाठी मैदानात !

0

मुंबई: सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरून झाले आहे. प्रचाराला सुरुवात झाले आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न नेत्यांचा आहे. दरम्यान मराठी बिग बॉस-२ चे विजेते अमरावतीचे सुपुत्र शिव ठाकरे मनसेसाठी मैदानात उतरला आहे. मनसेसाठी शिव ठाकरे प्रचार करत आहे.

माहिमचे मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे, मराठी कलाकार अभिनेत्री स्मिता तांबे, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर मैदानात उतरले आहे. मराठी माणसांसाठी मनसे नेहमी मदतीला येते आता आपण संदीप देशपांडे यांना निवडून द्यावे असे शिव ठाकरे आणि अभिनेत्री स्मिता तांबे करत आहेत.

माहिम मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेचे आदेश बांदेकर यांचा पराभव करत माहिम विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविला. त्यावेळी काँग्रेसकडून लढलेले सदा सरवणकर यांनाही मोठ्या प्रमाणात मते पडली होती. मात्र नंतर सदा सरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा ६ हजार मतांनी पराभव केला होता.