सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथे 350 व्या शिवराज्याभिषेक हा जेष्ठ शु। 13 शके 1596 रोजी झाला छत्रपतीचा राज्याभिषेक हा धर्म, संस्कृती व समाजाचे रक्षणासाठी होता अनेक वर्षे चाललेल्या हिंदूंच्या संघर्षाची ही विजयगाथा होती, हा राज्याभिषेक हिंदू समाजात आत्मविश्वास निर्माण करणारा होता, देव देश आणि धर्म रक्षणार्थ लढण्याचे सामर्थ्य देणारा होता म्हणून हा दिवस हिंदू साम्राज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने सावदा येथील गांधी चौकात दि 2 जून रोजी सायंकाळी 7 वा यावेळी जाहीर व्याख्यान आयोजित करन्यात आले असून यावेळी प्रमुख वक्ते योगेश अनिल देशपांडे, जामनेर हे असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मयूर शांतीलाल जैन हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे,