नाशिक विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक विधान परिषदेसाठी  शिवाजी सहाणे यांचा आज उमेदवारी अर्ज  नाशिकच्या निवडणूक कार्यालयात जावून दाखल करण्यात आला. शिवसेनेचे नेते असलेले शिवाजी सहाणे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, आमदार जयवंत जाधव, आमदार अपूर्व हिरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.