शिवम दुबे चेन्नई कडून खेळणार

Shivam Doobe in CSK |  जगातील सर्वात श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेत आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या महालिलावात एकूण ५९० खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसतील.

गेल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्स कडून चांगली कामगिरी करत संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या दीपक चहरवर चेन्नई संघाने पुन्हा विश्वास ठेवला आहे. त्याला संघात घेण्यासाठी चेन्नईने १४ कोटी रुपये मोजले आहेत.

बंगळुरूने श्रेयस अय्यरसाठी बोली लावली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही मोठी बोली लावली.अखेर केकेआरने म्हणजेच कोलकत्ताने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.

त्यानंतर रविचंद्रन अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चुर्शी पाहायला मिळाली अखेर . राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले.

मिस्टर आयपील सुरेश रैना यंदाच्या मोसमात धक्कादायक रित्या अनसोल्ड खेळाडू ठरला आहे.

अष्टपैलू वेस्ट इंडिज खेळाडू डीजे ब्रावो म्हणजेच ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. ४.४० कोटी देत सीएसकेने त्याला संघात घेतले.

नुकताच भारतासाठी खेळलेला अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डाला लखनऊ संघाने ५.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.

 

अजिंक्य राहणे या सत्रात कोलकाता संघा कडून खेळणार आहे. त्याला संघात घ्यायला कोलकाता ने १ कोटी रुपये मोजले.

 

शिवम दुबे आत्ता चेन्नई कडून खेळणार आहे. दुबेला संघाकडून खेळवण्यासाठी चेन्नईने ४ कोटी रुपये मोजले