शिवनेरी किल्ल्यावर तरुणीची आत्महत्या

0

पुणे-पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर एका तरुणीने आत्महत्या केली आहे. गडावरील झाडाला गळफास लावून ही आत्महत्या करण्यात आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. ही तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. मृत मुलगी जुन्नरची रहिवासी आहे.

तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली आहे. तरुणी दुचाकीने गडाच्या पायथ्याशी पोहोचली होती. पोलिसांनी तरुणीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. सोबतच तरुणीची शाळेची बॅगही घटनास्थळी आढळली आहे. दरम्यान, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने ही आत्महत्या आहे की घातपात यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.