दोन राज्यांच्या सिमेवरील शिवरस्ता रावेर तहसीलदारांनी केला मोकळा

रावेर प्रतिनिधी l

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सिमेवरील सुमारे ६० वर्षापासुन तक्रारग्रस्त शिवरस्ता रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या प्रर्यत्नामुळे मोकळा झाला. त्यांनी मध्यप्रदेश तहसीलदारांशी संपर्क साधुन दोन्ही तहसीलदार प्रत्यक्ष शिवरस्त्यावर उपस्थित राहून अतिक्रमन काढले व मोकळा केला. मोकळा केलेल्या रस्त्यामुळे सुमारे पन्नास शेतक-यांच्या चेह-यावर आंनदफुलला मागील अनेक वर्षा पासुन शिवरस्ताचे अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारी होत्या. परंतु आज प्रत्यक्षात रस्त्याने मोकळाश्वास घेतला.

 

मध्य प्रदेश येथील (लोणी) तर महाराष्ट्रा मधील (चोरवड) सिमेवरील शिवरस्ता संदर्भात सुमारे ५० शेतक-यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.मागील अनेक वर्षा पासून याबाबत शेतकरी तहसिलचे चकरा मारत होते. याची स्वता:तहसीलदार बंडू कापसे यांनी दखल घेत मध्यप्रदेश येथील बुरहानपुर तहसीलदार रामलाल पगारे यांच्याशी संपर्क साधुन दोन्ही तहसीलदार मध्यप्रदेश महाराष्ट्रा सिमेवर पोलिस यंत्रणासह उपस्थित झाले व दोन्ही बाजूने सुमारे पाच किमी अंतरावरील पंधराफूटा पर्यंतचा अतिक्रमन झालेला भाग काढून मोकळा केला.यावेळी मंडळ अधिकारी विठोबा पाटील यांनी हा शिवरस्ता मोकळा करण्यासाठी परिश्रम घेतले

शेतक-यांनी रावेर तहसीलदारांचे मानले आभार

 

दोनराज्याच्यालोणी व चोरवड या दोनराज्याच्या सिमेवर हा शिवरस्ता असल्याने येथील शेतकरी ब-याच वेळा रावेर तहसील कार्यालयात चकरा मारत होते.तत्कालिन तहसिलदार याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होते.परंतु याला विद्यमान तहसीलदार बंडू कापसे अपवाद आहे.त्यांनी या तक्रारीची दखल घेत दोन राज्यांच्या सिमेवरील रस्ता असल्याने मध्य प्रदेश तहसीलदार यांच्याशी संपर्क साधुन प्रत्यक्ष जाऊन मोकळा केला या बद्दल या परिसरातील शेतक-यांनी महाराष्ट्रा व मध्य प्रदेश शासनाचे आभार मानले.