पंचायत समित्यांवरही सेना-भाजपचे वर्चस्व

0

जळगाव- जिल्हा परिषदेप्रमाणेच विविध तालुक्यांच्या पंचायत समित्यांमध्येही भारतीय जनता पक्षाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. या खालोखाल शिवसेनेला यश लाभले आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता येणार असून चार ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. पारोळा तालुक्यात फक्त राष्ट्रवादीला सत्ता मिळाली असून चाळीसगाव मध्ये भाजप व राष्ट्रवादीला समसमान म्हणजेच प्रत्येकी सात जागा मिळाल्या आहेत.

बोदवड पंचायत समितीत चारही जागांवर भाजपाने विजय मिळविल्याने बोदवड पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात जाणार आहे. भुसावळ पंचायत समितीतल्या 6 पैकी 4 जागांवर भाजपाने विजय मिळविले तर प्रत्येकी एक जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेसचा विजय होऊन येथे भाजपची सत्ता येणार आहे. जळगाव पंचायत समितीत 10 पैकी 5 जागांवर शिवसेनेचा विजय (बहुमत शिवसेनेला) तर भाजपाला 3 तर अपक्ष उमेदवाराला 2 जागा आहेत.धरणगाव पंचायत समितीत 6 पैकी 5 जागेवर शिवसेनेचा विजय(बहुमत शिवसेनेला) तर भाजपाला 1 जागा मिळाली आहे.चोपडा पंचायत समिती- 14 पैकी 5 जागा भाजपाला तर 5 जागा राष्ट्रवादीला, शिवसेनेला 2 जागा असून बहुमत शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबुन आहे. यावल पंचायत समिती- 10 पैकी 5 जागा भाजपाने मिळविल्याने बहुमत भाजपाला, या ठिकाणी कॉग्रेसला 4 तर अपक्ष उमेदवाराला 1 जागा आहे. रावेर पंचायत समिती-12 पैकी 8 जागा भाजपाने मिळविल्याने बहुमत भाजपाला, या ठिकाणी राष्ट्रवादीला 2 तर शिवसेना व कॉग्रेसला प्रत्येकी 1 जागा आहे. मुक्ताईनगर पंचायत समिती- 8 पैकी 6 जागेवर भाजपाचा विजय असल्याने या ठिकाणी भाजपाची सत्ता येणार तर राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा आहे. अमळनेर पंचायत समिती- 8 पैकी 5 जागेवर भाजपाचा विजय तर 3 जागेवर राष्ट्रवादीचा विजय असल्याने बहुमत भाजपाकडे आहे. पारोळा पंचायत समिती- 8 पैकी 4 जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने बहुमत राष्ट्रवादीकडे तसेच भाजपाला 1 तर शिवसेनेला 3 जागा.एरंडोल पंचायत समिती-6 पैकी 4 जागेवर शिवसेनेचा विजय असल्याने बहुमत सेनेकडे या ठिकाणी राष्ट्रवादीला 1 तर अपक्षाला 1 जागा. जामनेर पंचायत समिती- 14 पैकी 10 जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी तर 4 जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार विजयी असून बहुमत भाजपाकडे असेल.पाचोरा पंचायत समिती-10 पैकी 5 जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी तर राष्ट्रवादीला 3, सेनेला 1 कॉग्रेसला 1 जागा असून बहुमत भाजपाकडे आहे. भडगाव पंचायत समिती- 6 पैकी 3 जागेवर शिवसेना विजयी, भाजपाला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली असून बहुमत शिवसेनेकडे आहे. चाळीसगाव पंचायत समिती- 14 पैकी 7 जागेवर भाजपा तर 7 जागेवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमदेवार विजयी या ठिकाणी समान पध्दतीने उमेदवार निवडुन आले असल्याने स्पष्ट बहुमत नाही. यामुळे येथे ईश्‍वर चिठ्ठीने पेच सोडविले जाणार आहे.

Web Title- Shivsena and BJP are leading in Panchayat Samiti also