मोदी, राहुल गांधी, फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा!

0

मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये ‘उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो’. अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेकदा उघडपणे भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंशी जवळीक करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत असल्याची शंकाही यानिमित्ताने व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही फलक, होर्डिंग लावू नका असं सांगत पर्यावरण जपण्याचं आवाहन केलं आहे.