पिंपरी :- गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या रोजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. या इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आज (दि.३०) सायकल मोर्चा काढण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत सतत होणा-या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध शिवसैनिकांनी केला. पिंपरीतील मोरवाडी चौकापासून सायकल मोर्चा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
मोर्च्यात यांचा होता सहभाग
या मोर्चामध्ये खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका आश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक संपत पवार, अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा समन्वयक माधव मुळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.