जळगाव । राज्य शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली असून अद्याप कोणत्या शेतकर्यांना कर्जमाफ झाली यांच्या याद्या राष्ट्रीयकृत बॅकांनी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाखेच्या बॅकेसमोर याद्या लावावे तसेच शेतकर्यांना 31 मार्च 2017 पर्यंत ज्या शेतकर्यांनी कर्ज घेतले आहे त्या शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी होवून त्यांचा शेताचा सातबारा कोरा करावा अशी मागणी सोमवारी 10 जुलै रोजी जिल्हा बँके समोर शिवसेना दुपारी 12.30 वाजेच्या सुमारार ढोल बजाव आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. विशेष बाब म्हणजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार किशोर पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेवून शेतकर्यांच्या मागण्यापुर्ण करण्यासाठी ढोल वाजविण्यास सक्रिय सहभाग घेतला होता.
बुधवारी उद्धव ठाकरे यांचा जिल्हा दौरा
बुधवार 12 जुलै रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जिल्हा दौरा असून ते जळगाव, धरणगाव व पारोळा तालुक्यातील शेतकर्यांशी संवाद साधणार आहे. आज झालेला ढोल बजाव आंदोलन संपुर्ण राज्यात होत असून शासनाने या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हेच आंदोलन आगामी काळात तिव्र करणार आहेत. आज शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाले असून त्यांची कर्जमाफी होणार की नाही असा सवाल निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात तुरचे मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता त्यानुसार शेतकर्यांना तुर पिकाची लगवड करा असे आवाहन करण्यात आले होते. शेतकर्यांनी आपल्या शेतात तुर पिकाची लागवड करून उत्पादनाची वाढ केली त्यावेळी मात्र व्यापार्यासह सरकार तुरीचा भाव कमी करून टाकला. हे सर्वस्वी चुकीचे असून एक प्रकारे शेतकर्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकर्यांचा सातबारा कोराच झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी सांगितले.
आठ दिवसात याद्या प्रसिद्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शेतकर्यांची सरसकट झाली नाही तर शेतकरी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. शेतकर्यांची कर्जमुक्ती घोषणा होऊन देखील 20 ते 25 दिवस उलटून गेली तरी सरकार व बँकेचे अधिकारी शेतकर्यांना कर्ज मुक्तीचे पत्र किंवा बँकेत यादी देखील अजून लावली नाही ही खेदाची बाब आहे. म्हणून आज रोजी आम्ही बँकेचे अधिकारी व सरकार यांना जाग येण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. कर्जमुक्ती शेतकर्यांचा याद्या येत्या 8 दिवसात न लावल्यास शिवसेना व शेतकरी यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देत देण्यात आला असून पुढील होणार्या परीणामास जिल्हा बॅक जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, यांच्यासह गणेश सोनवणे, शहर संघटक दिनेश जगताप, शिवसेना उपमहानगर प्रमुख नितीन कुळकर्णी, शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र जगताप, शिवसेना विभाग प्रमुख हेमंत महाजन, जितेंद्र बारी, किशोर जाधव, अजय भाटीया, कमलेश चौहान, विकास खराटे, राजेंद्र भल्ला, सचिन मुंदडा, मुकेश जाधव, प्रिन्स अग्रवाल, राजेश शर्मा आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Web Title- Shivsena dhol bajao andolan