महाबळेश्वर – पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे अणुशक्तीनगरचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्तांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. वेण्णा लेक येथील चौकात वनसमितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडे पर्यटन कर मागितला. याचा राग येवून आमदार काते यांनी वनसमिती कार्यकर्त्याला मारहाण केली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आमदाराविरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप वनसमिती कार्यकर्त्यांनी केला.