शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना हलविले अज्ञात स्थळी

0

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. वनगा कुटुंबीय शिवसेनेत दाखल झाले आहे. त्यामुळे भाजपच्या गोट्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान वनगा कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप-सेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान भाजपकडून वनगा कुटुंबियांची मनधरणी सुरु आहे. तर शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना अज्ञात स्थळी हलविल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट मध्ये बैठक घेणार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपचे पालगरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या नाराज कुटुंबियांनी भाजपविरोधात दंड थोपटले. व

वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केला. त्यामुळेच चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलगा 3 मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.