शहादा – तालुक्यातील धुरखेडा शिवारातील उसाच्या शेतात तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून सध्या ऊस तोडणीचा हंगाम असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी व भक्षाच्या शोधात येणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे
तालुक्यातील काथर्दे खुर्द येथील विजया बेन प्रकाश पाटील यांच्या मालकीचे सर्वे नंबर 124 / 2 शेत धुरखेडा शिवारात असून सदर शेतक-यांना दिनेश पाटील हे करीत आहे त्यांनी शेतात ऊस लावला आहे आज सकाळी ते शेतात आले असताना त्यांना शेतातील परिसरात बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता मादी बिबट्या हा एका सापळ्यात अडकलेला आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सदर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यासाठी सकाळी अकरा वाजेपासून वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाले होते
सदर मादी बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास प्राण्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकली असावी अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे या बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यासाठी वनविभागाने बिबट्या समोर काही अंतरावर पिंजरा लावला व आजूबाजूला जाळी लावल्यानंतर वनविभागाने अडकलेल्या बिबट्याला सुखरूप सोडविण्यासाठी प्रयत्न केले सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व पथकाला यश आल्यानंतर अवघ्या काही क्षणातच या बिबट्याने सापळा म्हणून लावलेल्या पिंजऱ्यातील कोंबड्यांना लक्ष केले सुखरूपपणे पिंजऱ्यात आल्यानंतर वनविभागाने त्यास जेरबंद करून दोंडाईचा रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयात आल्यानंतर रात्री उशिरा तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला पुन्हा जंगलात सोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे
सदरची कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भंवर सहाय्यक वनरक्षक एस डी साळुंखे वनक्षेत्रपाल ए पी मेंढे सचिन खुणे अभिजीत पिंगळे वनपाल एस एम पाटील बी एल राजपूत पी ए पाटोळे वनरक्षक एस जी मुकाडे एस एच राठोड बी वाय पिंजारी जीआर वसावे गस्ती पथकाचे चालक एबी न्याहाळदे , नईम मिर्झा पोलीस नाईक जे बी गिरासे संजय वाघ यांच्यासह नंदुरबार येथील मानद वन्यजीव संरक्षक पथकाच्या दहा सदस्यांनी केली
सध्या ऊस तोडणीचा हंगाम असल्याने या हंगामात तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे शेतकऱ्यांनी शेतीतील पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतात लावलेले सापळे हे बेकायदेशीर आहे. अशा सापळ्यात मध्ये वन्य जीव अडकला त्याचा मृत्यू होऊ शकतो. यापुढे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात असे बेकायदेशीर सापळा आढळून येतील त्यांच्यावर वनविभागामार्फत कारवाई केली जाईल शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या शेतात प्राण्यांना पकडण्यासाठी सापळे लावू नये.
एस डी साळुंके सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग