धक्कादायक : वायसीएम हॉस्पिटलमधील कचराकुंडीत नवजात अर्भक सापडले!

पोलीस घटनास्थळी दाखल : बघ्यांची गर्दी, प्रशासनाची धावपळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कचरा कुंडीत आज सकाळी एक नवजात अर्भक सापडलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसाचे असलेले हे अर्भक आहे. मात्र, हे अर्भक कुणी टाकलं, याबबात सीसीटीव्ही द्वारे संबंधिताचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. त्या घटनास्थळी पोलिस देखील आले आहेत. हे बाळ कोणाचं आहे आणि असे कोण निर्दयी आई-बाबा आहे. ज्यांनी पोटच्या गोळ्याला असं फेकून दिलं. याचा आता शोध घेत आहेत. हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही, त्या स्त्री जातीच्या अर्भकाला रुग्णालयाच्या पाठीमागील गेटमधून येवून कचरा कुंडीत फेकलं आहे. त्यामुळे सदरील नवजात अर्भक कुणी टाकलं, त्याचा शोध आम्ही घेत असून सीसीटीव्ही तपासले जात आहे, असे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.