शोगिनी’ कंपनीला भीषण आग

0

पुणे – खेडशिवापूर टोलनाका परिसरातील ‘शोगिनी’ या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीला पहाटेच्या सुमारास ही आग लागली. ‘शोगिनी टेक्नोआर्ट’ ही कंपनी प्रिंटेड मॅन्युफॅक्चर सर्किट बोर्ड बनवते. येथील केमिकलला आग लागल्याने फोमचा वापर करुन अग्निशामक दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहे.