श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल शहादा पंधरा लाख त्रेपन्न हजार रुपये चोरीला गेले असून शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

शहादा, ता. २१: श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल शहादा पंधरा लाख त्रेपन्न हजार रुपये चोरीला गेले असून शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रोहीदास पाटील वय ५८ धंदा व्यापार रा. गायत्री पार्क, लोणखेडा, ता. शहादा यांनी फिर्याद दिली असून दि. १९ ते २० जुनच्या दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादीच्या श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल, शहादाच्या ऑफिसमधील ड्राव्हर व एका छोट्या कपाटामध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी ठेवलेले १५लाख ५३ हजार रुपये कोणातरी अज्ञात चोरट्यांने ऑफिसचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चोरुन नेले. याबाबत भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोसई छगन चव्हाण करीत आहेत.