द रेमंड मिल जळगाव येथे श्री सूर्यकांत (राजू) चौधरी सेवानिवृत्त कार्यक्रम संपन…

भुसावळ l भुसावळ येथील श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी (चुनवाडेकर) यांचे धाकटे बंधू रेमंड मिल जळगाव कर्मचारी श्री सूर्यकांत ( राजु) जनार्दन चौधरी भुसावळ.कुशल जॉबर. दी रेमंड मिल, जळगाव. (39) वर्ष इमाने इतबारे सेवा कार्य करून सेवा निवृत्त झाले .. रेमंड मिल व सेक्शनचे श्री अनिकेत चौधरी श्री चंद्रशेखर माळी श्री सिंग व श्री शहापुरे बंधू युनियनचे श्री नवल पाटील, श्री पुरुषोत्तम खडके , श्री भास्कर रडे सहकारी, संघटना पदाधिकारी ,यांचे तर्फे प्रदीर्घ सेवा कार्य तून सन्मानपूर्वक कार्यक्रमात सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.. त्यांच्या कार्याचा व कौशल्याचा हा गौरव सोहळा आहे. कामावर असलेली श्रद्धा व आत्मसात केलेली कौशल्य आधारे दिलेल्या टार्गेट पेक्षा अधिक उत्पादन पूर्ण करून देणारं असलेल व्यक्तिमत्व सूर्यकांत चौधरी होते .असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. भावी उर्वरित आयुष्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. त्यांचे समवेत पत्नी सौ मंजुषा चौधरी,वडील बंधू श्री चंद्रकांत चौधरी चिरंजीव दिवेश चौधरी उपस्थित होते.अभिनंदन चौधरी साहेब भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! परिवारातील सदस्य या संवेदनशील सेवानिवृत्त कार्यक्रमात भारावून गेले होते.