भुसावळ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहची सांगता…

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळ तालुका सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची महाआरतीने सांगता झाली.

मंगळवार सकाळी साडेदहा वाजता महाआरती करून सप्ताहाची सांगता करण्यात आली. या कालावधीत भुसावळ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात विविध सेवा करण्यात आल्या. यात अखंड प्रहर सेवा सोबत गणेश याग, मनोबोध याग, चंडीयाग, रुद्र याग, गीताई याग. स्वामी याग,मल्हारी याग असे विविध याग करण्यात आले. श्री स्वामी समर्थ मंत्र जप 12 लाख 12 हजार 84, श्री नवार्णव मंत्र मंत्र जप 1 लाख 75 हजार 716, श्री गायत्री मंत्र माळजप 1 लाख 66 हजार 536 श्री महामृत्युंजय मंत्र माळ जप 29 हजार 592, दुर्गा सप्तशती पाठ 102, श्री स्वामी चरित्र सारामृत 210, श्री रुद्र पाठ 152, श्री मल्हारी सप्तशती 161. सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण 150 अशाप्रकारे सेवा करण्यात आली.

तसेच या सप्ताह काळात ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत 18 ग्राम अभियानचे विविध स्टॉल लावण्यात आले असून ग्राम अभियान बद्दलचे मार्गदर्शन आलेल्या सेवेकर्‍यांना करण्यात आले.