श्रीलंकेतील बॉम्बस्फोटची कल्पना आधीच दिलेली होती; पोलिसांची माहिती

0

कोलंबो:श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील बॉम्बस्फोटाच्या घटनेआधीच पोलिसांनी हल्ल्याचा इशारा दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि आसपासच्या परिसरातील सहा ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत १६० पेक्षा अधिक नागरिक ठार झाले आहे तर जखमींची संख्या ४०० च्यावर पोहोचली आहे.

ईस्टर संडे साजरा होत असताना आत्मघाती हल्लेखोरांनी कोलंबोतील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांना लक्ष्य केलं. सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवले. रविवारी सकाळी झालेल्या या हल्ल्याआधी पोलीस प्रमुखांनी आत्मघाती हल्ल्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता, अशी माहिती उपलब्ध कागदपत्रांचे आधारे समोर आली आहे.

दरम्यान, साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकन सरकारने उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करत आम्ही श्रीलंकन जनतेसोबत असल्याचे सांगितले आहे. तसेच भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.