कोलंबो:श्रीलंकेची राजधानी कोलंबोत रविवारी ‘ईस्टर संडे’च्या दिवशी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३५९ नागरिकांचा मृत्यू झाला तर ५०० जण जखमी झालेत. ही घटना ताजी असतांनाच आज कोलंबोपासून ४० किमी दूर असलेल्या पुगोडाजवळ स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली आहे.
पुगोडातील स्थानिक कोर्टाच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेवर हे स्फोट झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे स्फोट नेमके कशामुळे झाले याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयएस या दहशतवादी संघटनेने घेतली होती. या हल्ल्या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला असून काहींना अटक करण्यात आली आहे.