सिद्धरामय्या सरकार जातीयवादी

0

बंगळूर-कर्नाटक निवडणूक काळात सिद्धरामय्या सरकार मंदिरावरील भगवे झेंडे काढायला लावत आहे. कोणत्याही निवडणूक आयोगाचे असे आदेश नव्हते. मात्र तरीही सरकार मंदिरावरील भगवे झेंडे काढण्याचे आदेश देत आहे. कॉंग्रेस मुस्लीम मत मिळविण्यासाठी हा ढोंग करत असल्याचे आरोप भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांना यांचे मंदिरावरील ध्वज उतरविण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. हे कोणते राजकारण आहे याची विचारणा अमित शहा यांनी केली आहे. कोणत्या प्रकारे कॉंग्रेसची पाच वर्षाची सत्ता होती. ३५०० शेतकरी आत्महत्या झाली, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे आरोप शहा यांनी केले आहे.