भुसावळ- रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः भुसावळसह जळगाव स्थानकावरून प्रवाशांच्या मोबाईलसह मौल्यवान ऐवजांवर चोरटे डल्ला मारत असल्याने गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य आहे.
प्रवाशाचा मोबाईल लांबवला
भुसावळ- अप 18030 शालिमार एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या जयचंद्र हरीचंद्र राठोड (वय 21, रा.चिखली, सावळा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) या प्रवाशाचा चोरट्यांनी 14 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. 1 मे रोजी रात्री नऊ वाजता ही घटना भुसावळ स्थानकावरून गाडी सुटताना घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवाशाची बॅग लांबवली
भुसावळ- अप 12656 नवजीवन एक्स्प्रेसच्या कोच एस- 9 च्या बर्थ क्रमांक 56 वरून प्रवास करणार्या भानु राजन (57, कोटीवाक्कम, चिळकवलमेपूर, चेन्नई) या प्रवाशाची बडनेरा-अकोला दरम्यान चोरट्यांनी बॅग लांबवल्याची घटना 2 रोजी सकाळी सहा वाजता घडली. लाल रंगाची ट्रॉली बॅगमध्ये चार साड्या, तीन हजार रोख, शाल, टॉवेल, पर्स असा मिळून पाच हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. अकोला पोलिसात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
जळगाव स्थानकावरून मोबाईल लांबवला
भुसावळ- 18421 पुरी-अजमेर एक्स्प्रेसच्या कोच नंबर एस- 8, बर्थ नंबर सहावरून प्रवास करणार्या फिर्यादी हडमतसिंग बहादुरसिंग (28, लखमावा, कोटा, शिवगंज, तिरोही, राजस्थान) यांचा आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. जळगाव स्थानकावरून गाडी सुटताना ही घटना घडली. दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईच्या प्रवाशाचा मोबाईल लंपास
भुसावळ- अप ट्रेन 12108 लखनौ-एलटीटी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस 8 मधून प्रवास करणार्या फिर्यादी अजीत सूर्यनाथ मौर्य (26, रा.रूम नंबर 305, तिसरा माळा, दत्त नगर, घनसोली, नवी मुंबई) यांचा 11 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. कानपूर येथून फिर्यादी प्रवास करीत असताना भुसावळ येथे गाडी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.