मुक्ताईनगर- तालुक्यातील हरताळे शिवारातील गट नं.145 मध्ये सुरू असलेले खडी मशीन बंद करण्यात यावे यासाठी अनेकवेळा तक्रारी दिल्यानंतर महसूल प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्यामुळे निमखेडी खुर्द येथील ग्रामस्थांनी व शेतकर्यांनी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रचना पवार यांना निवेदन देत हे खडी मशीन तत्काळ बंद न केल्यास 9 रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
लोकवस्तीसह पिकांना धोकात
सदरील ठीकाणी स्फोटकांच्या सहाय्याने उत्खनन होत असल्याने आजूबाजूला असणार्या लोकवस्तीला व शेतीला यापासून नुकसान होत असून खडी मशीन व स्फोटकांपासुन निघणार्या धुळेमुळे परीसरातील सुपीक शेतजमीन नापीक होत असल्याने व सदरील खडी मशीन धारक हा सरकारी नियम व अटींअटींना पायदळी तुडवत असल्याने तहसीलदार, मुक्ताईनगर, उपविभागीय अधिकारी, भुसावळ व जिल्हाधिकारी, जळगाव यांना तक्रारी करूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे 9 मे रोजी खडी मशीन समोरील मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निमखेडी येथील ग्रामस्थ व शेतकर्यांनी दिला आहे .
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, अफसर खान, प्रवीण चौधरी, निमखेडी येथील शेतकरी, संचालक वाघ, आनंदा वाघ, संजय पठाडे, गोपाळ लवांडे, संजय निकम, प्रकाश बोरसे, रघुनाथ घोडकी, इंदुबाई घोडके, सुधाकर घोडके, लहानु घोडके, संतोष कोळी, वसंता भलभले, आनंदा ठाकरे यांच्यासह असंख्य शेतकरी, ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.