नवी दिल्ली-रणवीर सिंग व सारा अली खान यांच्या बहुप्रतिक्षीत ‘सिम्बा’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे.’ आंख मारे…’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘सिम्बा’चे हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे…’चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीने हे गाणे नव्या अंदाजात शूट केले आहे. अर्थात गाण्यातील डान्स मुव्ह सामान्य आहेत. काही डान्स स्टेप्स तर ८० व ९० व्या दशकातील आहेत. अर्थात यालाही एक कारण आहे. ‘आंख मारे’ हे गाणे मुळातच मस्तीने थिरकायला लावणारे गाणे आहे. त्यामुळे गाण्यात डान्स स्टेप्स सामान्य ठेवण्यात आल्या आहेत. अर्थात तरिही हे गाणे लोकांना आवडले आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासात हजारो लोकांनी हे गाणे पाहिले.