ओड़िसा रेल्वे अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांना शिंदखेडा तालुका कॉंग्रेस पार्टीच्या वतीने भावपुर्ण श्रद्धाजंली – रेल्वे मंत्र्याची राजिनाम्याची मागणी
शिंदखेडा ( प्रतिनिधी )-– ओड़िसा राज्यात शुक्रवारी ( दि 2 जुन ) कोरोमंडल हावडा एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर होऊन झालेला अपघात हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा अपघात असुन जवळपास 300 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची दुखद बातमी असुन 1000 वर गंभीर जखमी झाल्याची घटना देशात घडली आहे संवेदना म्हणुन मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांना शिंदखेडा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने येथील शिवाजी चौफुलीवरील कॉंग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर व माजी सभापती प्रा सुरेश देसले यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच जे लोक जखमी झाले आहेत त्यांना परमेश्वर लवकर बरं करो अशी प्रार्थना ही करण्यात आली त्याचप्रमाणे या घटनेची सर्वांकष चौकशी झाली पाहिजे व दोषींवर त्वरित कार्यवाही करावी व रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर .माजी सभापती प्रा. सुरेश देसले, सरपंच डोंगरगाव प्रकाश पाटील, शिदंखेडा नगरपंचायत माजी प्र.नगराध्यक्ष दिपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी , पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, प्रा. विशाल पवार, शहराध्यक्ष दिनेश माळी , रावसाहेब सुभाष देसले, किरण थोरात, दीपक भदाणे, महेंद्र भदाणे, भानुदास भदाणे, भागवत परदेशी, शब्बीर खा पठाण, निमण पठाण ,न्हानभाऊ माळी , वेडू माळी, सुधाकर मराठे, राजेंद्र भामरे, भैय्या मराठे, गजेंद्र भामरे, गोटू आप्पा महाले ,देविदास देसले,फारुख पठाण मोहम्मद शेख.राकेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.