शिंदखेडा तालुका गिऱ्हाईक सह. सोसायटी पंचवार्षिक निवडणुकी च्या चेअरमन पदी रमेश भामरे तर व्हायचेअमन पदी संतोष वाडिले यांची बिनविरोध निवड

 शिंदखेडा ( प्रतिनिधी ) — येथील शिंदखेडा तालुका गिऱ्हाईक सहकारी सोसायटी लि. सन 2023-24 ते 2028-29 या पंचवार्षिक निवडणुक प्रकिया पार पाडली. सदर निवडणुकीत चेअरमन पदी रमेश चिंतामण भामरे तर व्हायचेअरमन पदी संतोष अरविंद वाडिले सर यांची बिनविरोध करण्यात आली. हयासाठी सहाय्यक निबंधक संजय गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.डी.महाले सहाय्यक सुशिल महाजन यांनी काम पाहिले. आज शिंदखेडा तालुका गिऱ्हाईक सह सोसायटी च्या कार्यालयात सन -2023-24 ते सन -2028-29 हया पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. त्यात सदरच्या पंचवार्षिक निवडणुक ही बिनविरोध पार पडली. त्यात चेअरमन पदी रमेश चिंतामण भामरे तर व्हायचेअरमन पदी संतोष अरविंद वाडिले सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित संचालक प्रकाश नागो देसले, दगा तानका चौधरी, राजेश भाई ईश्वरलाल शाह, विजय डोंगर पवार, राजाराम देवराम माळी , परिक्षीत विजय देशमुख, अशोक गैधल पाटील, अनिल पोपटराव बोरसे, मुस्ताक शेख मुशीर , महिला प्रतिनिधी रमनबाई मिठाराम गिरासे , संगिता प्रविण पाटील यांची निवड करण्यात आली. हयावेळी सभेचे स्वागत व प्रस्तावना दगा चौधरी यांनी केले. व्यवस्थापक मिठाराम गिरासे , विनोद बोरसे, प्रविण पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर बिनविरोध निवड झाल्याबद्दल नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे , माजी उपाध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले, भाजपा शहराध्यक्ष प्रविण माळी, युवराज माळी, आर.एच.भामरे, देवेंद्र बोरसे सह पदाधिकारी व सभासदांनी अभिनंदन केले. सदर संस्थेची स्थापना 1950 साली होती. संस्थापक चेअरमन दौलत महिपत पाटील. व्हायचेअरमन तानका नथ्थु चौधरी यासह सभासदांनी सुरुवात केली होती त्यावेळी सिमेंट एजन्सी, साखरेची एजन्सी, व कापड व्यवसाय, धान्य विभाग म्हणून तालुक्यात व जिल्यात नावाजलेल्या पैकी एक होती. सध्या धान्य विभाग नियमित सुरु आहे. सदर निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शेवटी दगा चौधरी यांनी आभार व्यक्त केले.