गायक दलेर महेंदी यांचा भाजपात प्रवेश !

0

नवी दिल्ली: सुप्रसिद्ध गायक दिलेर मेहंदी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील भाजपचे उमेदवार हंस राज आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला.

लोकसभा निवडणूक सुरु झाल्यापासून दिग्गज सेलिब्रेटी राजकारणात प्रवेश करत आहेत. भारतीय माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. ऑलम्पिक विजेते बॉक्सर विजेंदर सिंग हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये तर अभिनेते सनी देओल भाजपात प्रवेश केला आहे.